औरंगाबाद- गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी लाटेत सहज तरलेल्या जालना व औरंगाबाद मतदारसंघातील मातब्बरांना यावर्षी मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. मोदींची ओसरलेली लाट, राहुल गांधींचा उदय आणि मतदार संघात विरोधकांचे वाढलेले प्राबल्य यावर हे दोन्ही मातब्बर नेते कशी मात करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
राज्यातील अतिशय लक्ष लागून असलेल्या मतदारसंघात जालना आणि
औरंगाबादचा समावेश होतो. या दोन्ही मतदारसंघावर भाजपचे रावसाहेब दानवे शिवसेना
उपनेते चंद्रकांत खैरे यांची पकड आहे. आपल्या पक्षात चांगले वजन आहे. गेल्या
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने या दोन्ही मातब्बरांना तारले, असे बोलले जाते. यावेळी मात्र मोदी
लाटेचा लाभ मिळणार नसल्याने कडवे आव्हान उभे राहिले आहे. जालना लोकसभा मतदारसंघात
मित्रपक्ष शिवसेनेने अर्जुन खोतकर यांच्या रूपाने रावसाहेब दानवे यांच्या समोर
अडचणी निर्माण केल्या आहेत. तर औरंगाबाद मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांनी
खैरे विरोधात दंड थोपटले आहेत. लातूर येथे भाजपाचे राष्ट्रीय
अध्यक्ष अमित शहा यांनी केलेले वक्तव्य युती साठी धोक्याची घंटा ठरले. आता युती
झाली तर आश्चर्य वाटेल असे म्हणण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत ावसाहेब दानवे
यांना खोतकर यांचे आव्हान महागात पडू शकते. काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसला
या भांडणाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत.
जालन्यासाठी कल्याण काळे यांच्या शिवाय सध्या तरी काँग्रेस कडे दुसरा चेहरा
नाही. राष्ट्रवादीने औरंगाबादच्या जागेवर दावा ठोकला आहे.
जालना किंवा औरंगाबाद यापैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळू शकतो.
जालन्यात टोपे उमेदवारीसाठी दावा दाखल करू शकतात औरंगाबाद मिळाला तर सतीश चव्हाण
यांची उमेदवारी पक्की आहे.भाजपने वेगळे लढण्याची तयारी सुरू केली आहे. औरंगाबाद
साठी हरिभाऊ बागडे, जयसिंगराव गायकवाड, राज्य महिला अध्यक्षा विजया रहाटकर, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष
डॉ. भागवत कराड यांची नावे भाजपकडून चर्चेत आहेत.
भाजपने खासदार खैरे वर टीकेचा भडिमार सुरू केल्याने युती झाली नाही
तर भाजप चांगलाच जोर लावेल असे दिसते. या दोन्ही मतदारसंघात दानवे आणि खैरे
यांच्या समोर अडचणींचा डोंगर उभा आहे. काँग्रेस पक्षांतर्गत आ. अब्दुल सत्तार आणि
आ.सुभाष झांबड यांच्यातील वाद अधिकच चिघळला आहे. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत
काँग्रेसला बसणार यात शंका नाही. एकंदरीतच पक्षांतर्गत वाद मित्रपक्षातील वाढती
दरी यामुळे या दोन्ही मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक अतिशय तिची आणि रंगतदार होणार
यात शंका नाही.